Site icon e लोकहित | Marathi News

“दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपने स्वतःचा पक्ष बांधावा”, मनसेने दिला भाजपला सल्ला

"BJP should build its own party instead of breaking other's party", advised MNS to BJP

मनसे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) टोल नाक्यावर अर्धा तास ताटकळत ठेवल्यामुळे मनसे (Maharashtra Navnirman Sena) कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी थेट समृद्धी महामार्गावरील टोल नाका फोडला, त्यावरून मनसेला टीकेचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र भाजपाने (BJP) एक व्हिडिओ शेअर करत अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भाजपच्या या आरोपांचा मनसेकडून समाचार घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

ऐकावे ते नवलच! तलाठ्याने घेतली लाच अन् समोर पोलीस दिसताच केलं भयानक कृत्य

“ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले ते आम्हाला काय शिकवणार? दुसऱ्याचे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपने स्वतःचा पक्ष बांधावा. एक टोल नका फुटला म्हणून आता एवढी थोबाड उघडली, परंतु मणिपूरमध्ये (Manipur) एवढा घटना घडल्या, त्यावेळी भाजप गप्प का होते. भाजपवाल्यांनी आम्हाला दादागिरी शिकवू नये, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिला आहे.

Government scheme । आनंदाची बातमी! ५०% अनुदानावर आजच करा शेळीपालन, काय आहे योजना? जाणून घ्या

2014 मध्ये भाजपा-शिवसेनेने सत्तेत येत असताना राज्यातील टोल नाके बंद करु असे आश्वासन दिले होते. त्याचा त्यांना आता विसर पडला आहे. त्यांनी आम्हाला दादागिरी शिकवू नये, आम्हाला दादागिरी करताही येते आणि चांगल्या प्रकारे निभावताही येते, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

Chanakya Niti । शत्रूवर सहज विजय मिळवायचा असेल तर आचार्य चाणक्यांच्या लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Spread the love
Exit mobile version