Site icon e लोकहित | Marathi News

Jammu-Kashmir: कठुआ जिल्ह्यात झाडाला लटकवला भाजप नेत्याचा मृतदेह, पुढील तपास सुरू

BJP leader's body hanged from a tree in Kathua district, further investigation is underway

दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) कठुआ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.कठुआ जिल्ह्यातील हिरानगर भागात मंगळवारी भाजप (BJP) नेत्याचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. घटनास्थळी पोहचून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सोम राज (Som Raj Murder) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.या हत्येने कठुआ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.सोम राज गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.त्यामुळे हत्या (Murder) आहे की आत्महत्या (Suicide), असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Nashik: नाशिकमध्ये टोलनाक्याच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांचे रास्ता रोको आंदोलन, केल्या ‘ या ‘ विविध मागण्या

नेमक प्रकरण काय आहे

कठुआ जिल्ह्यातील हिरानगर शहरात भाजप नेते सोम राज राहत होते. त्यांच्या घरापासून काही अंतरावरच एका गावकऱ्याला सोम राज यांचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसून आला.दरम्यान गावकऱ्यांनी त्याने तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली.

कठुआचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आर.सी. कोतवाल यांनी सांगितले की,राज यांच्या शरीरावर रक्ताच्या खुणा होत्या.त्यामुळे राज यांची हत्या झाली की आत्महत्या, याचे गुढ वाढले आहे.त्यामुळे चौकशीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती (SIT) स्थापन करण्यात आली आहे.

पारंपारिक बैल पोळ्याचा ‘घे-या’ होतोय लुप्त…! वाचा सविस्तर माहिती

Spread the love
Exit mobile version