Site icon e लोकहित | Marathi News

आताची सर्वात मोठी बातमी! राखी सावंतला अटक

Biggest news ever! Rakhi Sawant arrested

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाते. राखी ही टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. राखी सावंत सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. इतकंच नाही तर राखी सावंत लोकांचे मनोरंजन करण्यात आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात नेहमीच अग्रेसर असते. दरम्यान, राखी सावंतला अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.

२३ जानेवारी २०२३ ला येतंय बाळासाहेब ठाकरेंबद्दल नाटक

बऱ्याच दिवसांपूर्वी राखी सावंत हिच्यावर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. आता याप्रकरणी राखी सावंतला अटक करण्यात आली आहे.

पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात; अपघातात श्रीगोंद्यातील ६ जण गंभीर जखमी

मुंबई पोलिसांनी राखी सावंतला अटक केली असून काही वेळातच तिला अंधेरी न्यायालयामध्ये हजर करणार आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये महिला मॉडेलच्या तक्रारीवरून राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सतत प्रयत्न करूनही ती येत नव्हती. त्यामुळे आज पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी घेतली शंभूराजे देसाई यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

Spread the love
Exit mobile version