Site icon e लोकहित | Marathi News

आत्ताची सर्वात मोठी बातमी! पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा

Biggest news ever! Pankaja Munde's sugar factory raided by GST department

सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Cooperative Sugar Factory) GST विभागाचा छापा पडल्याची माहिती समोर आली आहे. GST च्या अधिकाऱ्यांनी कारखान्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु आहे. सकाळी १० वाजेपासून हे याधिकारी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात पोहोचले आहेत.

अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत!

माहितीनुसार, केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्या प्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या काही दिवसापासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आणि यामध्येच आता कारखान्यावर कारवाई केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, फडणवीसांचे मोठे वक्तव्य

नेमकी कोणत्या कारणामुळे कारखान्याची चौकशी सुरु आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. तसेच राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

गोमूत्र ठरतंय आरोग्याला हानिकारक! संशोधनात समोर आली धक्कादायक माहिती; वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version