Site icon e लोकहित | Marathi News

शरद पवार यांना मोठा धक्का! ‘हे’ राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाणार?

Big shock to Sharad Pawar! 'This' NCP MLA will go with BJP?

मागच्या काही दिवसापूर्वी नागालँड मधील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. दरम्यान, नागालँडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५ विधानसभा मतदार संघात आघाडी मिळवली असून २ मतदार संघात विजय मिळवला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आलेले आहेत.

मोठी बातमी! ‘या’ 2 कंपन्यांच्या शेअर्समधून झुनझुनवाला यांनी कमावले 650 कोटी

मात्र शरद पवार यांच्यासमोर एक वेगळाच पेच निर्माण झालेला आहे. आता याबाबत उद्या निर्णय होणार आहे. नागालँड सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडला आहे. यावेळी यासाठी अनेक मोठे मोठे नेते उपस्थित होते. नागालँडमध्ये एनडीपीपी नेते नेफियू रिओ यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एनडीपीपी आणि भाजप युतीने ३७ जागा जिंकल्या आहेत.

आफताब श्रद्धा प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती

नागालँड या ठिकाणी गतवेळीही विरोधी पक्ष नव्हता, सर्वपक्षीय सरकार होतं. त्यामुळे यावेळी देखील तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा विचार आहे. त्या ठिकाणचे स्थानिक नेते सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे जर अस झालं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपसोबत गेल्याचा शिक्का पडू शकतो. आता याबाबत उद्या सकाळी शरद पवार यांच्या भेटीनंतर निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत एका वृत्तवाहिनिने वृत्त दिले आहे.

ब्रेकिंग! भोजपुरी गायक पवनसिंहवर कार्यक्रमामध्ये दगडफेक; तोंडाला लागला जबर मार तातडीने केलं रुग्णालयात दाखल

Spread the love
Exit mobile version