
उद्धव ठाकरेंच्या ठाकरे गटासोबत शरद पवारांच्या पक्षाला देखील चांगलीच गळती लागली आहे. मागच्या काही दिवसापासून अनेक जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते, भगीरथ भालके हे बीआरएसच्या संपर्कात आहेत.
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा14 वा हप्ता
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना पक्षात घेतल्याने भगीरथ भालके नाराज आहेत अशा चर्चा मागील काही दिवसापासून रंगल्या आहेत. त्यामुळे भगीरथ भालके यांनी दुसऱ्या राजकीय पक्षांची चाचपणी करण्यास सुरु केली असल्याची माहिती समोर आलीये. राष्ट्रवादी काँग्रेस नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैद्राबादकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भयानक! तब्ब्ल ६ वर्षांपासून आईच्या मृतदेहासोबत राहत होता, धक्कादायक कारणही आलं समोर
केसीआर यांनी भालके यांच्यासाठी सोलापूरमध्ये विमान पाठवण्याचे नियोजन केले होते. मात्र त्यांनी अजून तेलंगणाकडे जाण्याचा निश्चित कार्यक्रम ठरवला नाही. मात्र जर ते बीआरएस पक्षात गेले तर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
ओडिशा रेल्वे दुर्घटना: कुटुंबीयांना आपल्याच माणसाचे मृतदेह ओळखता येत नाही…