Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! राहुल कलाटे यांना वंचितचा पाठिंबा जाहीर

Big news! Vanchit's support announced to Rahul Kalate

पुण्यामध्ये कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर कसबा पोटनिवडणुक जाहीर झाली. ( Kasba Assembly Elections 2023) ही निवडणूक बिनविरोध होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र या निवडणुकीत चुरशीचा सामना रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

रॉयल इनफिल्ड बुलेट आहे फक्त दिसायलाच रॉयल! गाडी घ्यायचा विचार करत असाल तर ‘या’ गोष्टींचा एकदा विचार कराच

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बंडखोरी करत कलाटे यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला. आता वंचित बहुजन आघाडीनं राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

ब्रेकिंग! भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज पृथ्वी शॉ च्या गाडीवर हल्ला

वंचित बहुजन आघाडीनं राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केल्याने चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी अजूनच वाढली आहे. कारण वंचितांना राहुल कलाटे यांना पाठिंबा दर्शविला त्यामुळं या निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला

Spread the love
Exit mobile version