Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात दोन तास चर्चा; राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण

Big news! Two hour discussion between Gautam Adani and Sharad Pawar; An atmosphere of confusion in political circles

अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी ( Gautam Adani) यांच्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. दि.२० गौतम अदानी यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. यासाठी ते स्वतः शरद पवार यांच्या दक्षिण मुंबई मधील सिल्व्हर ओक निवासस्थानी गेले होते. इतकंच नाही तर या दोघांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाली. मात्र ही चर्चा कशासंदर्भात होती? अदानींनी शरद पवारांची भेट का घेतली? या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यातच आहेत.

‘या’ कारणामुळे गौतमी आणि उर्फीवर कारवाई करता येत नाही; रुपाली चाकणकर यांचे वक्तव्य  

हिडेंनबर्गने प्रसिद्ध केलेल्या धक्कादायक अहवालामुळे गौतम अदानींच्या विरोधात विरोधी पक्षनेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अदानींची जेपीसी चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या समितीने केली आहे. ( JPC ) दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसी चौकशी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी व्हावी अशी भूमिका मांडली होती.

महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील घटनेच्या चौकशीवरून शरद पवारांचा सरकारला टोला; म्हणाले, ” शेवटी बॉसलाच रिपोर्ट…”

मात्र यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांमध्ये विरोधी मतप्रवाह वाहू लागले. त्यामुळे शरद पवारांनी जेपीसी चौकशी साठी आपल्याकडून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाठिंबा दर्शविला. आता गौतम अदानींनी या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भेट घेतली आहे का? की या भेटीमागे आणखी काही कारण आहे ? याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रम तयार झाला आहे.

सावधान! कोरोनाचा धोका वाढतोय; धक्कादायक आकडेवारी आली समोर

Spread the love
Exit mobile version