Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! कोयता गँगच्या म्होरक्याला पोलिसांनी केली अटक

Big news! The leader of the Koyta gang was arrested by the police

मागच्या काही दिवसापासून कोयता गॅंगने (Coyote Gang) दहशद माजवली आहे. ही गॅंग गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत आहे. त्याचबरोबर लोकांवर वार करायला देखील घाबरत नाही. त्यामुळे या गॅंगने लोकांच्या मनात भीती निर्माण केली. या गॅंगला पकडण्यासाठी ठोस पाऊले देखल उचलली. या गॅंगमधील काही सदस्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.

भारतातील सर्वात लहान कार लवकरच लाँच होणार! जाणून घ्या कारची किंमत आणि वैशिष्ट्ये

दरम्यान, आता गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे (Meena Thackeray) वसाहतीमध्ये दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा म्होरक्या सचिन माने याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्याच्या नऊ साथीदारांना देखील स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.

“…तर शिंदे सरकार कोसळणार”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच मोठ वक्तव्य

माहितीनुसार, या आरोपींकडून कोयते, तलवार अशी अनेक धारदार शस्त्र पोलिसांनी जप्त केली आहे. आता या सर्वांविरोधात संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. याबाबत माहिती स्वारगेटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर (Ashok Indalkar) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

“आयुष्यात एक काळ असा होता की मी रस्त्यावर…”, नागराज मंजुळेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग

Spread the love
Exit mobile version