Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! आमदार जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात

Big news! Terrible accident of MLA Jayakumar Gore

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा काल पहाटे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातीमधील फलटण तालुक्यातील मलटण गावच्या हद्दीमध्ये जवळपास ५० फुट खोल दरीत गाडी कोसळल्याने हा धक्कादायक अपघात झाला आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

रेशनकार्ड धारकांना दिलासा ; पुढच्यावर्षी देखील मिळणार मोफत अन्नधान्य

दरम्यान माहितीनुसार, या अपघातावेळी गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे एकटे नसून त्यांच्यासोबत अजून चौघेजण देखील गाडीमध्ये होते. या अपघातात त्या चौघांना देखील गंभीर दुखापत झाली असून, लवकरात लवकर पोलीस मदत मिळाल्याने आमदार जयकुमार गोरे आणि त्या चौघांना लवकरात लवकर पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आनंदाची बातमी ! 30 हजार शिक्षकांची शिक्षक भरती होणार

अपघात नेमका कसा झाला याची पोलीस यंत्रणा तपास करत असून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाची याबाबतची पाहणी देखील केली आहे. आमदार जयकुमार गोरे हे फलटणहुन माणच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे.

फिनोलेक्स कंपनीची कौतुकास्पद कामगिरी; शेतकऱ्यांसोबत साजरा केला राष्ट्रीय किसान दिवस

Spread the love
Exit mobile version