Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! पुन्हा एसटी संप होणार? ‘या’ कारणामुळे संतापले कर्मचारी

Big news! ST strike again? Angry employees because of 'this' reason

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी (ST) कर्मचारी संप करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळी (Diwali) जवळ आली असून एसटी कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्यातला पगार अजून देखील जमा झालेला नाही, त्यामुळे एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आता असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जेवण सुरू करण्याआधी ताटाभोवती पाणी का शिंपडले जाते? वाचा सविस्तर

जवळपास २५ टक्के अधिकारी आणि कर्मचारी (employees) यांना पगार मिळालेला नाही. उर्वरित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बँक खात्यांत शुक्रवारी-शनिवारी पगार जमा करण्यात आलाय. पण उर्वरित कर्मचाऱ्यांचे पगार कधी जमा होतील याबाबत काहीही माहिती नाही. दरम्यान, महामंडळाने उच्च न्यायालयात सांगितले होते की, राज्य सरकारकडून (State Govt) कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेण्यात येईल, त्यामुळे आता राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर पगार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बापरे! डॉमिनोज पिझ्झ्यामध्ये आढळलेत काचेचे तुकडे; पाहा PHOTO

सरकारकडून दिवाळीसाठी कर्मचारी आणि अधिकारी यांना जवळपास पाच हजार आणि अडीच हजार रुपये अशी भेट देण्यात येत असते. पण, आता अजून पगारच झालेला नाही मग दिवाळी भेट मिळणार का नाही याबाबत कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला आहे. कर्मचारी सप्टेंबर (September) महिन्याच्या पगाराची वाट पाहत आहेत, त्यांना हा पगार दिवाळीच्या आधी मिळणार का हे पाहावं लागेल.

Urfi Javed: हाय गर्मी! उर्फी जावेदन वाढवलं इंटरनेटचं तापमान; पाहा VIDEO

Spread the love
Exit mobile version