Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना न्यायालयीन कोठडी

Big news! Ravikant Tupkar, leader of Swabhimani Farmers' Association, has been remanded in judicial custody

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून लवकरच ते जामिनासाठी अर्ज करणार आहेत. रविकांत तुपकर यांच्या आत्मदहन आंदोलन दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह 25 कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार मात्र पक्षाबाबत नाराजी कायम!

पोलिसांनी रविकांत तुपकर ( Ravikant Tupkar) व त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर मारहाण केल्याचे न्यायालयात निष्पन्न झाले. दरम्यान आरोपींची वैद्यकीय तपासणी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी वकिलांनी केली आहे. यावेळी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी चार्जचा व्हिडीओ न्यायलयात सादर करण्यात आला.

“सापाला वाचवायला गेला अन् तरुणासोबत घडलं असं की….” पाहा VIDEO

महत्त्वाची बाब म्हणजे गजानन झांबरे ही व्यक्ती आंदोलनात सहभागी न्हवती. असे असताना देखील त्यांना आरोपी बनवण्यात आले आहे. गजानन झांबरे इतर ठिकाणी असल्याचे पुरावे सुद्धा आहेत. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस महासंचालक यांनी केलेला मेल व्यवहार देखील न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोप केला जात आहे.

मोठी बातमी! महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराला सुरुवात

Spread the love
Exit mobile version