Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! सोलापूरमधल्या बार्शीत फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट

Big news! Massive explosion in firecracker factory in Solapur during rain

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी (Barshi) या ठिकाणी फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फॅक्टरीमध्ये फटाके बनवत असताना भीषण स्फोट झाला आहे.

उर्फी जावेदला चित्रा वाघ यांनी सुनावले; चक्क अटक करण्याची केली मागणी!

हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले असून त्यांनी बचावकार्य सुरु केले.

मोठी बातमी! नाशिकमधील जिंदाल कंपनीला भीषण आग

दरम्यान, पोलीस यंत्रणेसोबतच तेथील स्थानिक नागरिकांनी देखील घटनास्थळी अडकलेल्या लोकांची मदत केली. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

ऋषभ पंतच्या भेटीनंतर अनुपम खेर यांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले…

Spread the love
Exit mobile version