Site icon e लोकहित | Marathi News

Mukesh Ambani : मोठी बातमी! मुकेश अंबानींच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

Big news! Death threat to Mukesh Ambani's family

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धमकीचे एकूण ८ फोन आले होते. हे फोन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाच्या क्रमांकावरून आले होते. या प्रकरणानंतर आता डीबी मार्ग पोलीसठाण्यामध्ये रुग्णालयांमधील लोकांनी तक्रार केली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

माहितीनुसार, तीन तासात अंबानींच्या कुटुंबाला जीवे मारणार असल्याची धमकी देणारे फोन आले होते. अज्ञात व्यक्तीने आठ फोन करत ही धमकी दिल आहे. ही धमकी दहशदवाद्यांनी दिली असावी अशी शक्यता रिलायन्स फाउंडेशन संचलित रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी (Dr. Tarang Dnanchand) व्यक्त केली आहे.

मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मुकेश आंबानीच्या ‘अँटीलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळून आली होती. या स्फोटकांसोबत धमकीची चिट्ठी देखील मिळाली होती. या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी सचिन वझे यांचा सहभाग असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने सचिन वझे याना अटक केली.

Spread the love
Exit mobile version