Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! केशवराव धोंडगे यांचं निधन; वयाच्या १०२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Big news! Death of Keshavrao Dhondge; He breathed his last at the age of 102

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या १०२ व्य वर्षी औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कायम लढत असायचे.

उर्फी जावेदला चित्रा वाघ यांनी सुनावले; चक्क अटक करण्याची केली मागणी!

केशवराव धोंडगे यांनी आमदार आणि खासदार म्हणून देखील लोकांचं प्रतिनिधित्व केलं. त्यांची भाषण देखील खूप गाजलेली आहेत. केशवरां धोंडगे हे कायम मराठवाड्यातल्या जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडत असत. जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेक आंदोलने देखील केली.

मोठी बातमी! नाशिकमधील जिंदाल कंपनीला भीषण आग

त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात त्यांनी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातून केली. त्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधिमंडळ आणि संसदेत कायम मांडले. ते पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

ऋषभ पंतच्या भेटीनंतर अनुपम खेर यांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले…

Spread the love
Exit mobile version