
मध्यंतरी उत्तरप्रदेश सरकारने ( UP Government) राज्यातील टॉप ६५ माफियांची यादी जाहीर केली होती. यामध्ये गँगस्टर अनिल दुजाना ( Anil Dujana) याचे नाव होते. दरम्यान उत्तर प्रदेश एसटीएफ सोबत झालेल्या इन्काऊंटर मध्ये गँगस्टर अनिल दुजाना याला ठार करण्यात आले आहे. मागील बरीच वर्षे तो दिल्लीमधील तिहार ( Tihar) तुरुंगात कैद होता. परंतु, काही काळापूर्वी जामिनावर त्याची सुटका झाली होती. तुरुंगाची हवा खाऊन आल्यानंतर सुद्धा अनिल शांत बसला न्हवता.
तिहार मधून बाहेर येताच त्याने त्याची पत्नी संगीता आणि जयचंद हत्या प्रकरणात असणाऱ्या साक्षीदारांना धमकावले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अनिल दुजाना वर कारवाई करत गुन्हे दाखल केले. मागील काही दिवसांपासून नोएडा पोलिसांची खास टीम एसटीएफच्या टीमसोबत दुजानाला पकडण्याच्या मोहिमेवर होती.
या टीम्सने मिळून २० पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी करत अनिल दुजानाचा मारण्यात आले आहे. दरम्यान आज झालेल्या इन्काऊंटर मध्ये अनिल दुजानाचा मृत्यु झाला आहे. अनिल दुजानावर आतापर्यंत जवळपास ५० गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये खूण, खंडणी यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.