Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी!२९ वर्षीय अभिनेत्रीचा ट्रक एक्सीडेंटमध्ये अपघाती मृत्यू

Pc-Facebook

Big news! 29-year-old actress died in a truck accident

Bangal : बंगालची सुप्रसिद्ध अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता (Suchandra Dasgupta) हिचा ट्रकएक्सीडेंट मध्ये मृत्यू झाला आहे. बंगालच्या टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ही अभिनेत्री खूप प्रसिद्ध होती. परंतु एक्सीडेंटमुळे तिच्या कुटुंबावर आणि मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली. सुचंद्रा शनिवारी नाईट शूटिंगवरुन येत होती. रस्त्यामध्ये एक सायकल स्वार रस्ता ओलांडताना या अभिनेत्रींच्या रस्त्यात आला होता. त्यावेळी सुचंद्राने ब्रेक मारला अनं नेमकं एका ट्रकने येऊन तिला धडक दिली. धडक देताच ती खाली पडली आणि त्याच ट्रकच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने तिला चिरडलं.

Onion | कांदा उत्पादक शेतकरी भडकले! गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांवर कांदे फेकण्याचा केला ठराव…

ट्रकची धडक इतकी जोरात होती की तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप गोंधळ उडाला होता आणि वाहतुकीची देखील कोंडी झाली होती.या प्रकरणाबद्दल माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रकसहित त्या ड्रायव्हरला देखील ताब्यात घेतला. या बंगाली अभिनेत्रीच्या मृत्यूमुळे तेथील सिनेसृष्टीवर खूप मोठी शोककळा पसरली आहे. सुचंद्राने बंगाली टीव्हीवरच्या अनेक सिरीयल मध्ये काम केले आहे.

अहमदनगरच्या दंगलीवरून शरद पवार संतापले; म्हणाले, “या धर्माचा…”

गौरी या सिरीयलमध्ये सपोर्टिंग रोल मिळाल्यानंतर ती बंगालमधील प्रत्येक घरात पोहोचली.तिचा फॅन फॉलोविंग वर्ग खूप मोठा होता. तिच्या मृत्यूमुळे चाहता वर्ग दुःखात बुडाला आहे.बिस्वरुप बंद्योपाध्याय यामध्येही तिने आपल्या कलेचा बाणा मिळवला होता.

सर्वसामान्यांसाठी दिलासदायक बातमी! खाद्य तेलाच्या किमतीमध्ये कपात, जाणून घ्या काय आहेत दर?

Spread the love
Exit mobile version