Site icon e लोकहित | Marathi News

बिग ब्रेकिंग! नरेंद्र मोदींच्या सभेआधी बीकेसीमधील कमान कोसळली

Big Breaking! The arch in BKC collapsed before Narendra Modi's meeting

नरेंद्र मोदी आज मुंबईच्या (Mumbai) दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी अनेक सेवांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात येणार आहे. आज त्यांच्या दौऱ्यानिमित्त मुंबईमध्ये बीकेसी मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आले आहे.

“पी दारू..खा गुटखा…”; आरोग्य शिबिराच्या उद्घाटनावेळी अजित पवारांचा मोठा सल्ला!

मात्र, या सभेआधीच सभास्थळी बीकेसी मैदानावर एक दुर्घटना घडली आहे. बीकेसीमधील कमान कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आता पोलीस यंत्रणा आणि कार्यकर्ते ही कमान हटविण्याच काम करत आहेत.

मोठी बातमी! सत्यजीत तांबे यांचं अखेर निलंबन

दरम्यान, मुंबई महापालिकांच्या (Mumbai Municipality) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. बीकेसी मैदानावर आज दुपारी ४ वाजता नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे.

तरुणाने वृद्ध व्यक्तीला दुचाकीसह नेलं फरपटत; पाहा VIDEO

Spread the love
Exit mobile version