Site icon e लोकहित | Marathi News

बिग ब्रेकिंग! शरद पवार महाविकास आघाडीच्या महामोर्चाल राहणार उपस्थित

Big Breaking! Sharad Pawar will be present at the grand march of Mahavikas Aghadi

राज्यात महापुरुषांबद्दल वक्तव्य करून चर्चेत येण्याचे सत्र सुरू असल्याचे पहायला मिळते. मागील काही दिवसांत भाजपच्या महत्त्वाच्या व मोठया नेत्यांनी चुकीची वक्तव्ये करत महापुरुषांचा अपमान केला आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagatsing Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा असणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहून संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार हे साडेबारा वाजता उपस्थित राहणार आहेत.

दूधवाला म्हणून महिलांची लूटमार करणारी बारामतीतील टोळी जेरबंद

भाजप पक्षामधील नेत्यांनी एकापाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्याबद्दल चुकीची वक्तव्ये केली आहेत. यामुळे महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून आज मुंबई येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईमधील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा असेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद; म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे…”

दरम्यान, या मोर्चामध्ये अनेक नेते सहभागी होणार आहेत. शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे संजय राऊत आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले, भाई जगताप व इतर नेते. तर, राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील इत्यादी नेते या मोर्चामध्ये सहभागी असणार आहेत.

‘या’ ठिकाणाहून निघणार महाविकास आघाडीचा महामोर्चा

Spread the love
Exit mobile version