Site icon e लोकहित | Marathi News

बिग ब्रेकिंग! भारतीय सैन्याच्या ३ विमानांचा अपघात

Big Breaking! 3 Indian Army planes crash

सध्या एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भारतीय सैन्याच्या ३ विमानांचा अपघात झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. राजस्थानमध्ये एका विमानाचा तर मध्यप्रदेशमध्ये २ हवाईदलाच्या विमानाचा अपघात झाला आहे.

‘या’ आजारामुळे अनंत अंबानीचे वजन वाढले आहे, नीता अंबानी यांनी केला मोठा खुलासा

सूत्रांच्या माहितीनुसार, राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उचैन पिंगोरा येथे लष्कराचे विमान कोसळून विमानाला आग लागली. त्याचबरोबर मध्य प्रदेशमधील मुरैना येथे आज सकाळी हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-३० आणि मिराज २००० क्रॅश झाली असून मोठा अपघात झाला आहे.

‘मन उडू उडू झालं’ मधील इंद्रा अडकला लग्नबंधनात! सोशल मीडियावरून दिली माहिती

या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरु आहे. पहाटे साडेपाच वाजता मध्यप्रदेशमध्ये दोन विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान यामध्ये दोन्ही वैमानिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

“आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ही चांगली गोष्ट आहे”, राज्यपालांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची जहरी टीका!

Spread the love
Exit mobile version