Site icon e लोकहित | Marathi News

राष्ट्रवादीला मोठा धक्का! अजित पवार नाराज?

Big blow to NCP! Ajit Pawar upset?

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबिर ( Manthan Camp of NCP) सुरू आहे. शरद पवार यांनी हॉस्पिटलमधून थेट शिर्डी येथे शिबिरास उपस्थित राहून अवघ्या महाराष्ट्राला थक्क केले आहे. परंतु, शिबिराच्या सलग दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) उपस्थित राहिले नाहीत. यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील लवकरच दौंड दौऱ्यावर; राहुल कुल यांनी घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली येथील अधिवेशनात देखील अजित पवार नाराज होऊन अचानक कार्यक्रमातून निघून गेले होते. पंरतु, यावर स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी आपण लघुशंकेला गेले असल्याचे सांगितले होते. खरंतर शरद पवार ज्या कार्यक्रमांना उपस्थित असतात. त्या ठिकाणी अजित पवार शक्यतो जात नाहीत. पण अजित पवारांचे मागच्या काही दिवसांतील वागणे पाहता या चर्चा अधिक जोर धरू लागल्या आहेत.

 विहीरीसाठी अनुदान मिळवणे झाले आणखी सोप्पे! सरकारने ‘ही’ अट रद्द केल्याने शेतकऱ्यांना होणार फायदा

अजित पवार सध्या एका कार्यक्रमानिमित्त त्यांच्या आजोळी असल्याने ते या शिबिरास उपस्थित राहू शकले नाहीत. गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil) यांनी नुकतेच ‘शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसला देखील मोठे खिंडार पडणार आहे’, असे विधान केले होते. या विधानाने कळत नकळत या चर्चांना खतपाणी घातले आहे.

शरद पवारांवर रुग्णालयात नक्की कोणते उपचार सुरू आहेत? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं

Spread the love
Exit mobile version