
Big accident in Sinhagad Ghat । सध्या पुण्यातून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये १० ते १२ जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे . रविवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Big accident in Sinhagad Ghat)
चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रविवारी संध्याकाळच्या सुमारास काही पर्यटकांना घेऊन जीप पायथ्याच्या दिशेन निघाली मात्र सिंहगड घाट रस्त्यावरील अकरा हजार वळणाजवळ ही जीप उलटली आणि जीपमध्ये १० ते १२ पर्यंटकांचा समावेश होता. जी उलटून बरेच जण खाली कोसळले आणि जखमी देखील झाले.
त्या ठिकाणी जाणाऱ्या अन्य वाहन चालकांनी ताबडतोब इतर वाहने थांबवली आणि अपघातग्रस्त जीप मधील पर्यटकांना बाहेर काढण्यात आले. या अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. जखमींवर जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
Salman Khan । चाहत्यांसाठी चिंतेची बातमी! सलमान खानच्या मेहुण्याच्या कारचा भीषण अपघात, नशेत…