Devendra Fadnavis: नव्या “नोंदणी व मुद्रांक” भवनाचे आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

Bhoomipujan of new "Registration and Stamp" building today by Devendra Fadnavis

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नोंदणी व मुद्रांक” भवनाचे भूमिपूजन शुक्रवारी (२ सप्टेंबर) दुपारी ३.१५ वाजता होणार आहे. तसेच मोबाइल उपयोजन (ॲप), नवीन संकेतस्थळ यासह इतर ई-सुविधांचा प्रारंभ देखील उपमुख्यमंत्री करणार आहेत. नोंदणी व मुद्रांक कार्यालयाच्या कामकाजाचे स्वरूप पाहता या कार्यालयासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारतीची गरज होती. त्यादृष्टीने पाऊल उचलून नवीन ‘नोंदणी व मुद्रांक भवन’ बांधण्यात येत आहे. विधान भवनासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात हे नोंदणी व मुद्रांक भवन उभारण्यात येणार आहे.

दिलासादायक! अखेर पीएम किसान योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार

कसे आहे या नवीन कार्यालयाचे स्वरूप?

या नवीन इमारतीत एकूण आठ मजले असणार असून साधारणतः पाच हजार चौ. मी. बांधीव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. इमारतीमध्ये नोंदणी महानिरीक्षक यांच्या कार्यालयाबरोबरच विभागाची इतरही कार्यालये असणार आहेत. त्यामध्ये वर्ग-एक संवर्गातील २१ अधिकारी, वर्ग-दोन संवर्गामध्ये २६ अधिकारी आणि वर्ग-तीन संवर्गामध्ये ८८ कर्मचारी असे एकूण १३५ अधिकारी व कर्मचारी यांची बैठक व्यवस्था होणार आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

Nitin Gadkari: नितीन गडकरींची मोठी घोषणा! पुण्यातील चाकणजवळ उभारले जाणार MMLP पार्क

नोंदणी महानिरीक्षक यांचे कार्यालय सुरुवातीपासूनच पुण्यामध्ये कार्यरत आहे. सन १९९१ पर्यंत बरॅकमध्ये, सन १९९७ पर्यंत शासकीय मुद्रणालय (गव्हर्नमेंट फोटो रजिस्ट्री) इमारत आणि त्यानंतर आतापर्यंत नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये हे कार्यालय कार्यरत आहे. त्यादृष्टीने कार्यालयाच्या कामकाजाची गरज ओळखून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *