Site icon e लोकहित | Marathi News

तरुणांनो सावधान! आता ‘आयटम’ शब्द वापराल तर येईल होईल शिक्षा; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

Beware young people! If you use the word 'item' now, you will be punished; Read what exactly is the case?

आता ‘आयटम’ (Item) शब्द संबोधने अंगलट येणार आहे. दरम्यान याआधी देखील एका मुलाला ‘आयटम’ शब्द संबोधल्या न्यायालयाने (court) शिक्षा ठोठावली होती. नेमक प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया. एका प्रकरणामध्ये पोक्सो न्यायालयाने तरुणाला दीड वर्षांची शिक्षा (punishment) ठोठावली आहे. शिक्षा ठोठावण्याचं कारण म्हणजे या तरुणाने एका अल्पवयीन मुलीला ‘आयटम’ म्हणून संबोधले होते. दरम्यान याबाबत कोर्टाने सांगितले आहे की, जेव्हा एखाद्या मुलीला उद्देशून ‘आयटम’ म्हटले जाईल त्याला लैंगिक शोषण (sexual abuse)समजले जाईल.

 …तर सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे पद रद्द होणार; काय आहे कारण?

हे प्रकरण १४ जुलै २०१५ मध्ये घडले होते. एका २६ वर्षीय व्यावसायिकाने १६ वर्षीय मुलीचा छळ केला. पीडित मुलगी शाळेतून घरी परतत होती. यावेळी त्या व्यावसायिकाने तिचे केस ओढले आणि ‘क्या आयटम कहाँ जा रही हैं?’ असं म्हटलं. तेव्हा त्या पिडितेने तातडीने १०० क्रमांकावर फोन फिरवला. दरम्यान घटनास्थळी पोलिस पोहोचेपर्यंत आरोपींनी तिला धक्काबुक्की केली. आणि तेथून पळ काढला.

भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानची भलतीच रडारड सुरू, ट्विटरवर #Cheating असा हॅशटॅग केला व्हायरल

दरम्यान न्यायालयाने ही बाब गंभीर मानत लैंगिक हेतूनं पाठलाग केल्याचं नमूद केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे न्यायाधीश अन्सारी याप्रकरणाच्या सुनावणीवेळी म्हणाले की, अशा रोडरोमिओंना धडा शिकवणे आवश्यक आहे. त्यामुळे पोक्सो कोर्टाने या आरोपीला दोषी ठरवले होते. दरम्यान त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांच्याबाबतीत माफीची याचिका करण्यात आली होती. परंतु कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली.

धक्कादायक! नातेवाईकानीच चार वर्षांच्या मुलाची अपहरण करून केली हत्या

Spread the love
Exit mobile version