
पुणे : पुणे (Pune) महानगरपालिका हद्दीमध्ये स्वाइन फ्लू (Swine Flu) रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार दिवसांत 131 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संसर्ग होण्याचे मुख्य कारण म्हणजे, गर्दी आणि एकमेकांच्या जास्त संपर्कात येणे होय.
१ ऑगस्ट रोजी आठ गंभीर रुग्ण होते आणि आता तीच संख्या ५ ऑगस्ट रोजी १४ इतकी झाली आहे. ससून जनरल हॉस्पिटल आणि बीजे मेडिकल कॉलेजचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. संजय गायकवाड म्हणाले की, H1N1 रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आता रुग्णांचे प्रमाण देखील खूप जास्त आहे. वारी तसेच नागरिकांकडून होणारी गर्दी हे वाढण्याचे प्रमुख कारण असू शकते. आता गणेशउत्सव आणि दिवाळी मध्ये जास्त रुग्ण वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
नागरिकांनी काळजी घ्या असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे. नागरिकांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे देखील आवाहन केले जात आहे.