
Beed News । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar group) आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे (Ram Khade) यांची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 फेब्रुवारीला मध्यरात्री हा संपूर्ण प्रकार घडला असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
ही घटना कन्हेवडगाव या ठिकाणी घडली असून गाडी पेटवतानाचा व्हिडिओ देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. राम खाडे यांनी राहत्या घरासमोर त्यांची स्कार्पिओ गाडी उभा केली होती. त्यानंतर मध्यरात्री चार अज्ञात तरुणांनी गाडीवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली. त्यानंतर गाडीच्या काचेवर दगड देखील मारले.
Manohar Joshi passed away । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन
यानंतर आवाज होताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर खाडे यांचे बंधू बाहेर आले आणि त्यांनी सर्व कुटुंबीयांना जागे करून गाडीवर पाणी टाकून आग नियंत्रणात आणली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.