Site icon e लोकहित | Marathi News

Beed Crime Govind Barge Death । प्रेम, ब्लॅकमेल आणि मृत्यू : गोविंद बर्गे प्रकरणात नर्तकी पूजाचे लॉज कनेक्शन उघड

Govind Barge And Pooja Gaikwad

Beed Crime Govind Barge Death । बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखमासल गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूप्रकरणात नर्तकी पूजा गायकवाड हिची चौकशी सुरु असून, तपासात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. कलाकेंद्रात नृत्य करणाऱ्या पूजाशी गोविंद बर्गे यांची ओळख झाली आणि नंतर ती एका प्रेमसंबंधात बदलली. पूजाने देखील हे प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांसमोर आधीच कबूल केले होते.

पोलिसांनी पूजाचे कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सॲप चॅट्स तपासले असता त्यांच्या भेटी फक्त कलाकेंद्रापुरत्या मर्यादित नव्हत्या. ती दोघं अनेक वेळा घरी, फ्लॅटवर तसेच बीड आणि वैराग परिसरातील विविध लॉजवरही एकत्र राहत असल्याचे समोर आले आहे. पूजाने चौकशीत हे सर्व उघडपणे मान्य केले आहे.

तपासात समोर आलेली मोठी बाब म्हणजे, गोविंदने वर्षभरात पूजावर भरपूर पैसा खर्च केला होता – दागिने, महागडे मोबाईल, जमीनखरेदीसाठी मदत आणि घरासाठी आर्थिक सहकार्यही केले होते. मात्र, पूजाची मागणी वाढतच गेली. तिने गेवराईतील बंगला आणि गोविंदच्या नावावरील जमीन तिच्या भावाच्या नावे करण्याचा आग्रह धरला. गोविंदने नकार दिल्यावर पूजाने त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. मानसिक तणावात असलेला गोविंद, पूजाला भेटण्यासाठी सासरगावी गेला, मात्र तिथेही ती न भेटल्याने त्याने कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

Spread the love
Exit mobile version