
विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. कुठल्याही बाबतीत त्यांची भूमिका ते स्पष्टपणे मांडतात. दरम्यान अजित पवारांचे बारामती ( Baramati) येथील निवासस्थान ‘सहयोग सोसायटी’ च्या प्रवेशद्वाराजवळ एका तरुणीला मारहाण करण्यात आली आहे. (Sahyog Society) काल (दि.६) ही घटना घडली. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी (Ajit Pawar) आपली रोखठोक भूमिका मांडत महत्त्वाचा इशारा दिला आहे. ( Girl get molested in Baramati)
धक्कादायक घटना! केरळमध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली; 15 जणांचा बुडून मृत्यू
शहरात वेडेवाकडे प्रकार होता कामा नयेत. सहयोगच्या परिसरात काल जे काही झाले त्याबद्दल मी पोलिसांशी बोललो आहे. त्यांनी या गोष्टीची नोंद घेतली असून यामध्ये दोन्ही बाजू आहेत. काल जो प्रकार घडला तो पुन्हा घडता कामा नये. अशा प्रकारात मी कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.
LIC ची सरल पेन्शन योजना! वर्षाला मिळणार एक लाखांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या सविस्तर..
एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पालकांना देखील चांगलेच सुनावले आहे. बारामतीकर पालकांनो आपण आपल्या मुली व मुलांना ते कुठे जातात? कोणाशी बोलतात? त्यांचे मित्र परिवार व मैत्रिणी कोण आहेत? याकडे लक्ष द्या. आईवडील म्हणून ही तुमची जबाबदारी आहे. अशा शब्दांत अजित पवारांनी पालकांची हजेरी घेतली आहे.
Ajit Pawar । अजित पवार ऑन फायर! म्हणाले, “राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरं काय येतं?”
काल सकाळी पाऊने नऊच्या सुमारास सहयोग सोसायटीच्या प्रवेश द्वाराजवळ ही घटना घडली. संबंधित तरुणी या ठिकाणी मेहेंदी काढण्यासाठी आली होती. यावेळी आरोपी अरफाज आत्तार याने ‘तू मला आवडतेस’ असे म्हणत तिच्या गालावर हात फिरवला. तसेच तरुणीला मारहाण करत विनयभंग केला.
Wtc Final 2023 | टीम इंडियाला मोठा दिलासा; केएल राहुलच्या जागी ‘या’ दिग्गज खेळाडूची निवड