Banana Crop Damage । वादळी पावसाचा तडाखा! केळीबागांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

Banana Crop Damage

Banana Crop Damage । करमाळा तालुक्यातील चिखलठाण व परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. अवकाळी पाऊस आणि वाऱ्यांमुळे शेतातील केळीची झाडं उन्मळून पडली असून, अनेक बागांमध्ये पाणी साचल्याने फळे सडू लागली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे.

Hagawane Fortuner Car | वैष्णवी हगवणे प्रकरण; अजित पवारांच्या हस्ते चावी दिलेली ‘ती’ फॉर्च्युनर जप्त

चिखलठाण, शेटफळ, उमरड, वांगी, कंदर, वाशिंबे या गावांमध्ये केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. ही लागवड अत्यंत खर्चिक असून, रोपे, खते, औषधे, सिंचन व्यवस्था आणि मजुरी यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला असतो. मात्र, या नैसर्गिक संकटामुळे त्यांचे सारे कष्ट वाया गेले आहेत. झाडांची मोडतोड आणि सडलेली फळे यामुळे बाजारात विक्रीसाठी पुरेसं उत्पादन मिळणार नाही, अशी शंका व्यक्त होत आहे.

सध्या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी. मात्र कृषी विभागातील सहाय्यक कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया रखडली आहे. अधिकारी वेळेवर शेतकऱ्यांकडे पोहोचत नसल्याने भरपाईसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करता येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.

Havaman Andaj । राज्यात माॅन्सूनचा मुक्काम; मुसळधार पावसाचा इशारा, रेड आणि ऑरेंज अलर्ट

शेतकरी म्हणतात की सध्याची नुकसानभरपाई अपुरी असून, केळी लागवडीचा खर्च पाहता भरपाई रकमेचे प्रमाण वाढवले पाहिजे. दरम्यान, जमीन दलदलीसारखी बनल्याने कोणतीही रासायनिक किंवा जैविक उपाययोजना करता येत नाही. शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, पंचनाम्यांना गती द्यावी आणि तात्पुरत्या स्वरूपात निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच भविष्यातील अशा संकटांना तोंड देण्यासाठी पाण्याचा योग्य निचरा होईल अशा योजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Spread the love