Site icon e लोकहित | Marathi News

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाप्पाच्या दर्शनासाठी राणेंच्या निवासस्थानी; भेटीचे सांगितले कारण

At Rane's residence for Darshan of Chief Minister Eknath Shinde Bappa; Stated reason for visit

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील ‘अधिश’ या निवासस्थानी गेले होते. तिथे त्यांनी राणेंच्या निवासस्थानी असलेल्या गणरायाचे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर, आमदार कालिदास कोळंबकर, समन्वयक आशिष कुलकर्णी आणि राणे कुटूंबीय उपस्थित होते. दरम्यान या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी राणेंसोबतच्या भेटीचे कारण सांगितले.

Amit Shah: ५ सप्टेंबरला अमित शहा मुंबईत येणार; राज ठाकरेंच्या भेटीची शक्यता

हे सर्वसामान्यांचं सरकार

एकनाथ शिंदेंनी ही एक सदिच्छा भेट सांगितले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “मी आज इथे दर्शनला आलो.राणे मुख्यमंत्री असतानाचे अनुभव त्यांनी सांगत जुन्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. मुख्य म्हणजे हे जनतेच म्हंजचेच सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी जे काही चांगलं करता येईल त्याबद्दल चर्चा झाली.

Anupam Kher: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अनुपम खेर नाराज, ट्विट करत म्हणाले…

आम्ही राजकीय काही चर्चा केलेली

मुख्यमंत्री शिंदे शेजारी उभे असलेल्या नारायण राणेंकडे पाहून म्हणाले की , “राजकीय काही चर्चा केलेली नाही आपण”,तर त्यावर राणेंनी हसून, “करत पण नाही” असं उत्तर दिलं. तसेच या भेटीत बाळासाहेबांच्या तसेच आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही पूर्वी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेलं आहे. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करत करत आम्ही इथपर्यंत आम्ही पोहोचलो,” असंही शिंदे म्हणाले.

Spread the love
Exit mobile version