Site icon e लोकहित | Marathi News

सध्या बाजारांमध्ये नवीन सोयाबीन आल विक्रीस, असा आहे बाजारभाव; वाचा सविस्तर

At present, new soybeans are sold in the markets, the market price is; Read in detail

देशातील अनेक बाजारांमध्ये (Market)सध्या नवीन सोयाबीन विकण्यासाठी आले आहे. परंतु या नवीन सोयाबीन (New soybeans) पिकाची स्थिती व त्याच्या उत्पादनाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांमध्ये व्यापाऱ्यांच्या (merchants) मते सोयाबीन पिकाची स्थिती ही चांगली आहे आणि सोयाबीनचे उत्पादनही चांगल्या प्रतिचे येईल. मात्र शेतकऱ्यांचे (Farmers) सोयाबीन पिकाबाबत वेगळं मत आहे. शेतकऱ्यांच्या मते सोयाबीन पिकाचं नुकसान होत आहे. जवळपास १५ दिवसांनी सोयाबीन पिकाची लागवड उशीरा झाल्या आहेत. त्यामुळे सोयाबीनची आवकही साधारणपणे 15 दिवसांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. आजपर्यंत देशात 120 लाख 90 हजार हेक्टरवर सोयाबीनची नोंद झाली आहे.

धक्कादायक! नवरात्रीनिमित्त घातलेल्या मंडपाला आग लागून दोन जणांचा मृत्यू तर, ६४ जण होरपळले

सोयाबीन पिकाची यंदाची स्थिती

व्यापाऱ्यांच्या मते, सप्टेंबर महिन्यापर्यंत सोयाबीन पिकाला पावसाचा तसेच कीड-रोगाचा फटका हा बसला नाही. परंतु व्यापाऱ्यांचे हे मत शेतकऱ्यांनी खोटं असल्याचं सांगितलं आहे. कारण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. इतकंच नाही तर सोयाबीनवर खोड कीड आणि येलो मोझॅक रोगाचा देखील प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे, असंही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली! कापूस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात होणार मोठी घट

यंदा बाजारात सोयाबीनला किती मिळणार भाव?

यंदाच्यावर्षी गेल्या हंगामातील १२ ते १५ लाख टन सोयाबीन हा शिल्लक आहे. त्यामुळे याचाही दबाव नव्या हंगामावर असेल, असा दावा व्यापाऱ्यांनकडून केला जात आहे. परंतु जाणकारांना हे मान्य नाही. मात्र शेतकऱ्यांनी येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे आताच देशातील सोयाबीन उत्पादन किती राहील, हे सांगता येत नाही. कारण मागील काही वर्षांमध्ये ऑक्टोबरमध्ये पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाच नुकसान वाढतंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये पाऊस कसा राहील, यावरून उत्पादन ठरवावं. तसेच जाणकारांच्या मते पुढील महिनाभर सोयाबीनला किमान 5,000 रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं पुढील महिनाभर बाजाराचा आढावा घेऊनच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करणं फायदेशीर ठरेल.

Eknath Shinde: जीवे मारण्याच्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Spread the love
Exit mobile version