
मुंबई : माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या ट्विटवरून भाजप अडचणीत आले आहे. या ट्विट मधील असभ्य भाषेवरून शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाजपवर निशाणा साधलाय. हे कसले राम हे तर हराम!, असं म्हणत त्यांनी भाजपा वर जोरदार टीका केली आहे. शिवाय भाजपचेच आमदार जर अशी असभ्य भाषा वापरणार असतील तर त्यांनी रामराज्याची भाषा करू नये, असंही ते म्हणालेत.
Sharmila Thackeray: शिवसेना नेमकी शिंदे गटाची की ठाकरेंची, शर्मिला ठाकरेंनी दिलं उत्तर
काय होतं ट्विटमध्ये ?
भाजप आमदार राम सातपुते आपल्या ट्विटमध्ये असे म्हणाले की, “आधी फाटलेल्या चड्डीला ठिगळं लावा, उगाच आभाळ हेपलायचे धंदे बंद करा, अश्या पद्धतीचं ते ट्विट त्यांनी केलं होतं. हे ट्विट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केले असल्याने त्यावर अरविंद सावंत यांनी आक्षेप घेतलाय. ट्विट मधील राम सातपुतेंच्या भाषेवर सावंत यांनी आक्षेप घेतला असून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी एक ट्विट करत भाजपावर जहरी टीकास्त्र सोडलय.
Arvind Kejriwal: सीबीआय आण इडीचा खेळ रोजच सुरूय , देशाची प्रगती कधी होणार मग – अरविंद केजरीवाल
अरविंद सावंतांचा आक्षेप
“कोण हे राम ! सातपुते.. भाजपचे सदस्य का? काय त्यांची भाषा, हेच का भाजपचे हिंदुत्वाचे संस्कार! आदरणीयचा असा घोर अपमान करणारे राज्यकर्ते भाजपचे अलंकारात. हे कसले राम, हे तर हराम. त्यांच्यावर शोध करून शोधणे आहेत देवेंद्र फडणवीसजी रामराज्याची भाषा करू नका”, असं ट्विट अरविंद सावंत यांनी केलं आहे.