
‘आई कुठे काय करते’ ही टेलिव्हिजन विश्वातील सर्वात जास्त गाजत असलेली मालिका आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात चांगलेच स्थान निर्माण केले असून, टीआरपीच्या रेसमध्ये देखील ती सर्वात वर असते. या मालिकेतून घराघरात पोहोचली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले प्रभुलकर होय. हिच ती तुमची अरूंधती. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत.
गौतमी पाटीलचा ‘खान्देश कन्या’ म्हणून सन्मान; पुरस्कार सोहळ्यात म्हणते,
मालिकेत अरुंधती आणि आशुतोष अखेर एकत्र आले आहेत. मालिकेची कथा पुन्हा एकदा अरुंधती आणि आशुतोष यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. नुकताच अरुंधती आणि आशुतोषचा मेंहदीचा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमात अनिरुद्धने घोळ घातला. त्यावेळी अनिरूद्धने यशवर हात उचलला.
‘हेरा फेरी ३’च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! राजुच्या भूमिकेत कार्तिक
या कार्यक्रमात अरुंधती आणि आशुतोषने एकमेकांसाठी खास उखाणा घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये अरुंधती उखाणा घेतना म्हणते की, आयुष्याच्या मध्यानीला अनुभवले शांत चांदणे सुखाचे… ध्यानीमनी नसताना लाभले आशुतोष जोडीदार आयुष्याचे.
आशुतोष उखाणा घताना म्हणतो की, बसलो होतो माझा मी माझ्या विचारांच्या गावी.. दूरच्या क्षितिजावर होती मनातली पहाट नवी.. अवचित एक रूक्ष क्षणी मोगऱ्याच्या सुगंध दरवळला… अरुंधतीच्या येण्याने मला जगण्याचा अर्थ समजला. यादरम्यान या दोघांनी घेतलेल्या उखाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अरुंधतीची आणि आशुतोषचे लग्न निर्विघ्न पार पडणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
इंस्टाग्रामवर वाढवायचे आहेत लाखो फॉलोवर्स? आजच फॉलो करा ‘या’