Site icon e लोकहित | Marathi News

Arpita Khan | मोठी बातमी! सलमान खानची बहिण अर्पिताच्या घरी चोरी

Arpita Khan | Big news! Salman Khan's sister Arpita's house stolen

अभिनेता सलमान खानची ( Salman Khan) बहीण अर्पिता खान ( Arpita Khan) कायम कोणत्या ना कारणाने चर्चेत असते. काल (ता.१६) तिने मुंबई पोलिसांकडे चोरीची तक्रार दाखल केली होती. अर्पिताच्या घरातून डायमंडचे महागडे ( Diamond earrings) कानातले चोरीला गेल्याची ती तक्रार होती. याप्रकरणी पोलिसांनी अर्पिताच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. संदीप हेगडे ( Sandip Hegade) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संदीप हा विलेपार्ले पूर्व येथे राहणारा असून अर्पिताच्या घरात तो काही महिन्यांपासून काम करत होता.

Maharashtra Politics | मोठी बातमी! महाविकास आघाडी फुटायला सुरुवात झाली, कोणी केला गौप्यस्फोट?

काही दिवसांपूर्वी अर्पिता खानच्या बेडरूममधील मेकअप ट्रेमध्ये ठेवलेले पाच लाखांचे डायमंड कानातले चोरीला गेले होते. संशयित आरोपी संदीप हेगडे मागील चार महिन्यांपासून अर्पिताच्या घरी काम करत होता. त्याच्यासोबत आणखी ११ लोक काम करणारे होते. यातील संदीप हेगडे ट्रे मधील कानातले घेऊन घरात कोणाला न सांगताच पळाला.

Maternity Leave | खुशखबर ! महिलांच्या प्रसूती रजेत होणार वाढ ; नीती आयोगाने केली शिफारस

पोलिसांनी तपास सुरू असताना संदीप हेगडेच्या घराची झडती घेतली. यावेळी अर्पिता खानचे कानातले संदीपच्या घरी सापडले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संदीपला अटक केली. याप्रकरणी आता आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अर्पिताला तिच्या लहानपणी सलमान खानच्या वडिलांनी दत्तल घेतले होते.

मोठी बातमी : कर्नाटकाचा तिढा सुटला, कोण होणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री?

Spread the love
Exit mobile version