
मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) बऱ्याच दिवसंपासून १०० कोटी खंडणी प्रकरणामुळे आर्थर रोड जेलमध्ये आहेत. दरम्यान आज त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे.अनिल देशमुख सकाळी ११ वाजता जेलमध्ये चक्कर येऊन पडले.
Bacchu kadu: “अहो मर्दानगी असेल, तर समोर या आणि पुरावे द्या” बच्चू कडूंचे विरोधकांना आवाहन
यानंतर त्यांची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.दोन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
“बैल पोळा” कृषीप्रधान देशाचा कृषी पुरक सन
अनिल देशमुख यांच्यावर नेमके आरोप काय?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याबाबतचा खळबळजनक आरोप केला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.
N V Ramana: सरन्यायाधीश रमणा यांचा शेवटचा दिवस, सेवानिवृत्ती कार्यक्रमात झाले नाराज