
कोरोनामुळे (Corona) सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केले होते. कोणालाच आपल्या घराबाहेर पडण्याची मुभा न्हवती. दरम्यान कोरोनाची तीव्रता कमी होताच बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले आणि लोकांचे जनजीवन पूर्वीसारखे सुरळीत झाले. परंतु, गुरुग्राम (Gurugram) येथील एक महिला मागील तीन वर्षापासून आपल्या अल्पवयीन मुलासह घरामध्ये बंदिस्त होती.
शेअर बाजारामध्ये पुन्हा घसरण; ‘या’ शेअर्सचे झाले मोठे नुकसान
कोरोनाच्या भीतीपोटी या महिलेने घरातून बाहेर पडणेच बंद केले होते. अखेर मंगळवारी (ता.21) पोलिसांनी या महिलेला बंदिस्त घरातून बाहेर काढले. गुरुग्राममधील चक्करपूर येथे ही 33 वर्षीय महिला आपल्या मुलासोबत राहत होती. या महिलेला घरातून बाहेर काढण्यासाठी मंगळवारी पोलीस, आरोग्य विभागाचे अधिकारी व बालकल्याण विभागाचे अधिकारी चक्करपूर येथे पोहोचले. यावेळी त्यांनी महिलेच्या घराचा दरवाजा तोडला.
चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात! बडे-बडे नेते प्रचारासाठी मैदानात
महिलेची व तिच्या 10 वर्षीय मुलाची घरातून सुटका होताच त्यांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या महिलेची मानसिक स्थिती योग्य नसल्याची माहिती सिव्हिल सर्जन डॉ.विरेंदर यादव यांनी दिली आहे. या महिलेचे नाव मुनमुन असे आहे. तिचा पती सुजन याने याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. 2020 मध्ये लॉकडाऊन शिथिल होताच कामासाठी बाहेर पडलेल्या आपल्या पतीला देखील या महिलेने आपल्या घरात प्रवेश करू दिला न्हवता.
“लग्न कधी करणार?”, प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण सध्या…”
मागील दोन वर्षांपासून सुजन हे एका भाड्याच्या घरात राहत आहेत. व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून ते आपली पत्नी व मुलाच्या संपर्कात राहत होते. याकाळात घराचे बील, किराणा, मुलाच्या शाळेची फी सुजनच भरायचा. दरम्यान ही महिला अतिशय खराब स्थितीत घरात राहत होती. कोरोनाच्या भीतीने ही महिला गॅस व पाणी देखील खूप कमी वापरत होती. या महिलेला घरातून बाहेर काढण्यासाठी सगळे उपाय करून थकल्यानंतर अखेर सुजन यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
“शरद पवार यांना फडणवीसांची भीती वाटत होती”, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठं वक्तव्य