Site icon e लोकहित | Marathi News

Rahul Gandhi | “…अन् राहुल गांधींनी पुन्हा जिंकले मन”, शेतात चालवला ट्रॅक्टर आणि केली भात लावणी

Gandhi

Rahul Gandhi | देशातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीचा विचार केला तर या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आजही आपल्याला पहिल्या क्रमांकावर दिसत आहेत. परंतु आता काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याही लोकप्रियतेत वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सर्वेक्षणात पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्यानंतर राहुल गांधी यांना दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. (Latest Marathi News)

असंही पवार प्रेम! शेतकऱ्यानं चक्क बैलाच्या अंगावर लिहलं “आम्ही साहेबांच्या सोबत”

सध्या राहुल गांधी शिमला (Shimla) दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सोनीपतच्या बरोदा मतदारसंघातील (Baroda Constituency) शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मत जाणून घेतले. त्यांनी त्या शेतकऱ्यांसोबत मदिना आणि बरोजा येथे भात पिकाची लागवड केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी यांनी शेतात ट्रॅक्टर देखील चालवल्याचे पाहायला मिळाले आहे.

लग्नाचा विधी सुरु होण्यापूर्वी वधूने केलं असं काही की नवरदेवाची झुकली शरमेने मान, पहा व्हायरल व्हिडिओ

दरम्यान, राहुल गांधी यांना मोदी आडनावाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच अंगलट आले आहे. गुजरात उच्च न्यायालयाने (High Court of Gujarat) पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये निदर्शने केली असून शिमल्यात राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्या आहेत.

राष्‍ट्रवादीचे चिन्ह कोणाला मिळणार, साहेब की दादा? शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हे ही पहा

Spread the love
Exit mobile version