Amruta Fadnavis । अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत; ‘त्या’ फोटोंमुळे झाल्या ट्रोल

Amrita Fadnavis in discussion again; Trolls were caused due to 'those' photos

Amruta Fadnavis । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर कायम त्यांची चर्चा होत असते. त्या कधी त्यांच्या गाण्यामुळे तर कधी त्यांच्या कपड्यामुळे चर्चेत येतात. त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केलं जात. नुकतीच त्यांनी लंडन येथील इंडियन ग्लोबल फोरमला भेट दिली. एका पॅनल डिस्कशनमध्ये अमृता फडणवीस या सहभागी झाल्या होत्या. (Viral Photo On Social Media)

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या पत्नी शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर काही फोटो शेअर केलेत आहेत. या फोटोमध्ये त्या नव्या लूकमध्ये दिसत आहेत. या शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांनी हाताला अजगर साप गुंडाळला असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर अजून एका फोटोमध्ये छोट्याशा मगराला हातावर ठेवल्याचे दिसत आहे.

नाट्यमय घडामोडीनंतर खाते वाटप जाहीर! जाणून घ्या अजित पवार यांच्यासह कोणाला कोणते खाते मिळाले

सध्या सोशल मीडियावर त्यांच्याच फोटोंची चर्चा होताना आपल्याला दिसतेय. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकजण त्यांना ट्रोल देखील करत आहेत.

दोन दिवसानंतर मुलाचं लग्न, नाचताना गाठले मृत्यूने; क्षणात झाल होत्याचं नव्हतं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Spread the love