Site icon e लोकहित | Marathi News

अमोल मिटकरींच्या ट्विटने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ; ट्विट करत म्हणाले, “भाजपाकडून…”

Amol Mitkari's tweet created excitement in political circles; Tweeting, "From BJP…."

राज्याच्या राजकारणामध्ये सध्या अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येणार नाही. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीच्या चर्चा सतत राजकीय वर्तुळामध्ये होताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. आता पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.

ब्रेकिंग! शरद पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “भाजपसोबत जाण्यासाठी…”

अमोल मिटकरी यांनी ट्विट करत लिहिले की, “भाजपा कडून आपला व आपल्या सहकाऱ्यांचा राजकीय घात झालाय हे फक्त एकनाथ शिंदे साहेबांना कळून चुकलंय असं मला शिंदे गटातील माझ्या एका आमदार मित्राने सांगितले आहे” असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

किंग कोहली करणार बॉलिवूडमध्ये एंट्री? प्रसिद्ध अभिनेत्याच्या खुलास्याने चर्चांना उधाण

दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्ताधारी पक्षाकडून दबाव तंत्राचा वापर करून जाणूनबुजून राष्ट्रवादी काँग्रेसला ( NCP) फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच तुम्ही तारीख आणि वार लिहुन ठेवा आता, शिंदे-फडणवीस सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. असा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला आहे.

अतिकच्या हत्येनंतर उत्तरप्रदेशमध्ये हायअलर्ट, मुख्यमंत्री योगींनी जनतेला केलं ‘हे’ महत्वाचे आवाहन

Spread the love
Exit mobile version