
Amol Kolhe । राज्याच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसापासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. सध्या देखील राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar group) काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होणार असल्याची माहिती समोर आली. आता यावर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde । पुण्यात एकनाथ शिंदे यांना बसणार मोठा धक्का? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत
बुधवारी शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी आमदार-खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील सद्यस्थिती आणि राज्यसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उपस्थित असलेले खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, राष्ट्रवादीचे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.
Sharad Pawar group । मोठी बातमी! शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?
राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप आणि अनिल देशमुख यांनीही या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या वृत्तात तथ्य नसल्याचे सांगितले. वेगळे निवडणूक चिन्ह घेऊन लढण्याची आमची तयारी आहे, आम्ही महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी म्हणून लढणार आहोत. आमचे निवडणूक चिन्ह अद्याप ठरलेले नसून आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने म्हटले आहे.
Ganpat Gaikwad । गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांना न्यायलयीन कोठडी