
मुंबई : शिंदे गट, अमित शहा (amit shaha)आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे महाराष्ट्रात दररोज दौरे सुरू आहेत. दरम्यान अमित शहा कालपासून मुंबई (Mumbai)दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावर असतानाच आज अमित शहांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. दरम्यान अमित शहांच्या या टीकेवर शिवसेनेचे अरविंद सावंत (Arvind sawant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, आज लोटस मिशन उद्या दुसरं काही, त्यांचं काही न काही चालूच असतं पण जे मूळ विषय आहेत ते मिसिंग दिसतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे अनेकदा सांगितलय आणि महाराष्ट्राला माहीत आहे ती परंपरा शिवसेनेची आहे. मुंबई हे बाळासाहेबांचं शक्तीस्थळ आहे. आणि तिथूनचं त्यांनी नारे दिले, तिथूनच विचार मिळाले, आंदोलने झाली आणि तिथूनच महाराष्ट्राला आणि देशाला दिशा मिळाली .बाळासाहेबांचं आवाज लोकांच्या कानात घुमतो आहे .ती जागा आणि तो दिवस पूर्णपणे शिवसेनेचाचं आहे आणि सिमोंलंघन शिवसेनेचचं होणार. अस देखील अरविंद सावंत म्हणाले.
Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाले…
पुढे अरविंद सावंत म्हणाले की, राज्यात सुरवातीच्या काळात भाजपाला शिवसेनेची साथ मिळाली म्हणूनच हे आजचे चित्र आहे. एवढेच नाहीतर पंतप्रधान मोदी ज्या पदावर आहेत त्यामध्येही देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. पण काळाच्या ओघात आणि सत्तेपुढे नरेंद्र मोदींना याची जाणीव राहिलेली नाही. पण त्यांनी या उपकाराची जाणीव ठेवायला हवी.