
मागच्या काही दिसापासून कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. त्यामुळे सरकारची तसेच सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, साताऱ्यात करोनाचे रुग्ण वाढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
भोला चित्रपटाने चार दिवसांत कमावला तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचा गल्ला
साताऱ्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालेल आहेत. यामध्ये करोनाचे उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील सामोर आली आहे. त्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यात नवीन कोरोनाचे 50 रूग्ण आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
पीकअप आणि इनोव्हा कारचा भीषण अपघात; ३ जण जागीच ठार
यामुळे साताऱ्यामधील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेतला आहे.