Site icon e लोकहित | Marathi News

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Ajit Pawar's reaction to Rahul Gandhi's cancellation of MP; said…

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला. मात्र दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता यावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. यामध्येच आता अजित पवार यांनी देखील प्रतीक्रिया दिली आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, खासदारकी रद्द होण्याची लोकसभेमधील ही दुसरी घटना आहे. याआधी देखील राष्ट्रवादीचे नेते महोम्मद फैजल यांची खासदारकी रद्द झाली होती असं अजित पवार म्हणाले आहेत.

त्याचबरोबर अजित पवार पुढे म्हणाले, “आज राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेण्यात आली. वास्तविक मतमतांतर, वैचारिक भूमिका वेगळी असू शकते पण, देशाला स्वतंत्र्य मिळालं तेव्हापासून कोणाची खासदारकी काढून घेतल्याचे मला आठवत नाही. असे यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.

राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच प्रियांका गांधी संतापल्या; म्हणाल्या, “देशाचा पैसा लुटणाऱ्यांच्या…”

घटनेने प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे आजच्या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांचं लग्न नेमकं कसं जुळलं? यासाठी कोणी पुढाकार घेतला; जाणून घ्या त्यांच्या लग्नाबद्दल काही खास माहिती

Spread the love
Exit mobile version