Site icon e लोकहित | Marathi News

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Ajit Pawar's big statement regarding Pune Lok Sabha by-election; said…

गेली 30 वर्ष पुण्यावर अधिराज्य गाजवणारे नेते म्हणजे गिरीश बापट. राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट. यांनी वयाच्या 73 व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे.

हार्दिक पांड्यावर टीम इंडियाची जबाबदारी? आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना मिळणार संधी

यानंतर राजकीय वर्तुळात पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पुणे निवडणूक विभागाने याबाबत तयारी केली असून लवकरात लवकर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्येच आता विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

शाळेत दोन शिक्षिकांची लागली भांडणे! प्रकरण एवढे तापले की, एकमेकींना लाथा आणि ठोसे मारत केसही ओढले; व्हिडीओ पाहून बसेल धक्का

निवडणुकीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “मला अशी माहिती समजली की, मला असं वाटत होतं की लोकसभेच्या निवडणूकीसाठी एकच वर्ष राहीलंय. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. पण बहुतेक गिरीश बापट यांचं दुखःद निधन झाल्यानंतर… ती पण पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातील माहिती असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ च्या उलट सुलट चर्चांवरून अदा शर्मा भडकली! म्हणाली, “तुमची आई, बहीण, प्रेमिका…”

Spread the love
Exit mobile version