अजित पवारांचे शिवसैनिकांना आवाहन; म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना पायउतार करणाऱ्यांचा बदला…”

Ajit Pawar's appeal to Shiv Sainiks; Said, "Revenge of those who deposed Uddhav Thackeray..."

पुण्यात कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दोन्ही भागातील निवडणूका मविआ आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असल्याने दोन्हीकडून कंबर कसून प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रवादीला मित्रपक्षाकडून धक्का! 91 जणांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंचवड येथील एका सभेत शिवसैनिकांना मोठे आवाहन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करणाऱ्यांचा बदला घ्या. असे अजित पवार (Ajit Pawar) यावेळी म्हणाले आहेत.

सलमान खानचे मोठ वक्तव्य म्हणाला, “मी माझ्या स्वतःच्या मर्जीने अविवाहित राहीलेलो नाही”

इजा-बिजा झाली आता त्यांना तिजा दाखवायची वेळ झाली आहे. त्याशिवाय गप्प बसायचं नाही. काय चुकलं? शिवसेना (Shivsena) कुणी काढली हे तुम्हाला माहित आहे. जे गेले त्यांचा शिवसेना काढण्यात खारीचा तर सोडाच नखाचा तरी वाटा आहे का? असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केला.

“संजय राऊत बँड पथकातील खुळखुळा वाजवणाऱ्या लहान मुलासारखे”, भाजपच्या नेत्याने राऊतांवर केली जहरी टीका

शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी तिकीट दिलं, म्हणून ते निवडून आले. असे म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला मारला आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुख व्हावं आणि आदित्य ठाकरेंनी युवासेना प्रमुख व्हावं ही बाळासाहेबांची इच्छा होती. मग हे सटर फटर कुठून आले? असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

आदिल खानबाबत राखी सावंतने केला मोठा खुलासा म्हणाली, “गर्लफ्रेंडला प्रेग्नंट करुन तो…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *