
Ajit Pawar । पुण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटलं जातं. मात्र या पुण्यामध्ये अजित पवार गटाला ठाकरे गटाने आणखी एक धक्का दिला आहे. मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना आव्हान देत लोकसभेचे रणशिंग फुंकले यानंतर आता शिरूर मधील अजित पवार गटाचे समर्थक शैलेश मोहिते यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. शैलेश मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. तळेगाव दाभाडे या ठिकाणी शैलेश मोहिते पाटील यांनी आपल्यासह शेकडो कार्यकर्त्यांसोबत ठाकरे गटात प्रवेश केला. या प्रवेशावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.
शैलेश मोहिते पाटील हे आळंदी खेड तालुक्याचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. त्यामुळे त्यांच्या ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. शैलेश मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे.
Maratha Reservation । “…तर मराठा आरक्षण टिकणार नाही”, जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
