Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar । “तुझी डेअरिंग वाढलीय… अ‍ॅक्शन घेईन!” – महिला अधिकाऱ्यावर अजित पवारांचा संताप, VIDEO व्हायरल

Ajit Pawar

Ajit Pawar । सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्यातील फोनवरील संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अजित पवार बेकायदेशीर खडी उत्खनन थांबवण्याची कारवाई करणाऱ्या DSP अंजली कृष्णा यांना रोखण्याचे आदेश देताना दिसत आहेत.

Laxman Hake | मोठी बातमी! लक्ष्मण हाकेंच्या गंभीर आरोपांनी राजकारणात खळबळ

१ सप्टेंबर रोजी माढा तालुक्यातील कुर्डू गावात बेकायदेशीर मुरूम उपशाची तक्रार मिळाल्यानंतर तहसीलदार आणि डीएसपी अंजली कृष्णा यांनी पोलिसांची टीम घेऊन कारवाई सुरू केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन केला आणि फोन DSP अंजली कृष्णा यांना दिला.

फोनवर अजित पवार म्हणाले, “मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय. कारवाई तात्काळ थांबवा आणि तिथून निघा.” मात्र DSP अंजली कृष्णा यांनी उत्तर दिलं, “मला कसं कळणार की तुम्हीच बोलत आहात?” त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे ओळख पटवण्याची मागणी केली. हे ऐकून अजित पवार भडकले आणि म्हणाले, “तुम्ही मला कॉल करायला सांगताय? तुमच्यावर अ‍ॅक्शन घेईन!”

Maratha Reservation । मुंबईत मराठा आंदोलन चिघळलं! आझाद मैदान रिकामं करण्याचा पोलिसांचा प्रयत्न; आंदोलकांचा निर्णायक निर्धार

यानंतर DSP अंजली यांनी आपला नंबर दिल्यावर अजित पवारांनी व्हिडिओ कॉल केला आणि म्हणाले, “माझा चेहरा ओळखता ना? तुमची डेअरिंग खूप वाढलीय.” त्यांनी पुन्हा एकदा कारवाई थांबवून तिथून निघण्याचा आदेश दिला. या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेतील हस्तक्षेपाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Spread the love
Exit mobile version