Site icon e लोकहित | Marathi News

विधानसभेत अजित पवारांनी उडवली गिरीश महाजनांची खिल्ली; म्हणाले, “अंकल… अंकल… काकीला नाव सांगेन”

Ajit Pawar ridiculed Girish Mahajan in the Assembly; Said, "Uncle… Uncle… I will tell Auntie the name."

सोमवारपासून महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल विधानसभेत खास त्यांच्या शैलीत भाषण केले. यावेळी त्यांनी मोदी सरकार व शिंदे-फडणवीस सरकार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी गिरीश महाजन यांची खिल्ली देखील उडवली आहे.

मागच्या पाच वर्षात अरबी समुद्रातील शिवस्मारक का झाले नाही? विधानसभेत अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

अजित पवार विविध मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरत होते. यामध्येच गिरीश महाजन यांनी अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवार यांनी गिरीश महाजनांचा उल्लेख ‘अंकल’ असा केला. महाजनांनी भाषणात अडथळा आणताच अजित पवार म्हणाले, “गिरीशजी एक मिनिट, आता माझं भाषण चालू आहे ना … अंकल… अंकल…काकीला सांगेन आ… मग किती काकी आहेत, ते आपल्याला बघावं लागेल” असा टोला देखील अजित पवारांनी यावेळी लगावला आहे.

राज्यसेवा 2021 ची गुणवत्ता यादी जाहीर! सांगलीचा प्रमोद चौगुले ठरला सलग दुसऱ्यांदा अव्वल

दरम्यान, या विधानसभेत अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारला आणि मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मागच्या पाच वर्षात अरबी समुद्रातील शिवस्मारक का झालं नाही? असा सवाल देखील यावेळी अजित पवार यांनी केला आहे.

ऋषभ पंतने अपघातानंतर पहिल्यांदाच दिली मुलाखत; म्हणाला, “जगण्याकडे पाहण्याचा…”

Spread the love
Exit mobile version