भाजपच्या पराभवावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पुन्हा एकदा विकास आणि…”

Ajit Pawar reacts on BJP's defeat; Said, "Once again Vikas and…"

मागील काही दिवसांत देशामध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे ( Karnataka Assembly Elections 2023) वारे वाहत होते. या निवडणुकीमध्ये कोण आघाडी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. बहुचर्चित कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये काँग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर आहे. या निवडणूकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

सचिन तेंडुलकरने बनावट जाहिराती संदर्भात मुंबई गुन्हे शाखेकडे केली तक्रार दाखल; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

Bollywood | बॉलिवूड मधील सासऱ्याची आणि सुनेची ‘ही’ अधुरी प्रेम कहाणी वाचून तुम्हालाही होईल दुःख!

ट्विट करत अजित पवार यांनी लिहिले की, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे.कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे.”

थाटामाटात लग्न झाले मात्र पतीकडून काहीचं रिस्पॉन्स मिळत नव्हता, नंतर पत्नीने वर्षाने उचलंल टोकाचं पाऊल; घटना वाचून बसेल धक्का

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *