Site icon e लोकहित | Marathi News

अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Ajit Pawar reacted to Amrita Fadnavis' 'that' statement, said...

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. एक समाजसेविका व गायिका (Social worker and singer) म्हणून सर्वत्र त्यांची ओळख आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर देखील त्या कायम सक्रिय असतात. यामध्येच आता अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती.

धक्कादायक! लोकांचे मोबाईल हिसकावून गाडीत बसत राखी सावंतने काढला पळ; पाहा Video

अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या, “झोकून काम करणारा नेता मुख्यमंत्री झालेला आम्हालाही आवडेल,” यानंतर पत्रकारांनी अजित पवार यांना याबाबत विचारलं. अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अतिक अहमदच्या हत्येबद्दल समोर आली धक्कादायक माहिती!

अजित पवार म्हणाले, “त्यामध्ये वाईट काहीच नाही मला कोणी चांगलं म्हणत असेल तर मला त्याच समाधान आहे. प्रत्येकाने चांगलं काम करावं म्हणजे प्रत्येकाला लोक चांगलं म्हणतील. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे.” असं म्हणत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मोठी बातमी! राहुल गांधी यांनी सोडला सरकारी बंगला

Spread the love
Exit mobile version